Nilesh Chavan : निलेश चव्हाणचा व्हिडीओ व्हायरल; लॅपटॉपमध्ये पोलिसांना सापडले आक्षेपहार्य व्हिडीओ

Nilesh Chavan : निलेश चव्हाणचा व्हिडीओ व्हायरल; लॅपटॉपमध्ये पोलिसांना सापडले आक्षेपहार्य व्हिडीओ

| Updated on: May 25, 2025 | 1:39 PM

Nilesh Chavan Viral Video : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण याचा एक नवा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. वरिष्ठांना हा प्रस्ताव पाठवलेला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त कदम यांनी दिली आहे. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता ही आणखी एक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, याच प्रकरणी फरार असलेल्या निलेश चव्हाणचा नवा व्हिडीओ समोर आलेला आहे. या व्हिडीओमध्ये कंबरेल बंदूक लाऊन निलेश चव्हाण नाचत असल्याचं दिसून येत आहे. निलेशवर वैष्णवीच्या माहेरच्या लोकांना धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. निलेश चव्हाणचा नवा फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आता त्याचा लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी देखील निलेशवर बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याची बंदूक जप्त करण्यासाठी रात्री उशिरा पोलीस निलेशच्या घरी धडकले होते. मात्र छापेमारीदरम्यान पोलिसांच्या हाती बंदूक लागली नाही. यावेळी पोलिसांनी त्याचा लॅपटॉप जप्त केला आहे. या लॅपटॉपमध्ये निलेशचे पत्नीसह इतर मुलींसोबतचे आक्षेपहार्य व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

Published on: May 25, 2025 01:39 PM