Raigad ZP Election Result 2026 Update | रायगडच्या आवास गटातून शिंदेंच्या शिवसेनेचे दिलीप भोईर विजयी
रायगड जिल्ह्यात झालेल्या जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत एकूण 59 जागा होत्या. यामध्ये आवास गटातून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप भोईर विजयी ठरले आहेत. या विजयामुळे शिंदेंच्या शिवसेनेला रायगड जिल्ह्यात स्थानिक पातळीवर महत्वाचा फायदा मिळाला आहे. रायगडमध्ये सध्या शिंदेंची शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे
रायगड जिल्ह्यात झालेल्या जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत एकूण 59 जागा होत्या. यामध्ये आवास गटातून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार दिलीप भोईर विजयी ठरले आहेत. या विजयामुळे शिंदेंच्या शिवसेनेला रायगड जिल्ह्यात स्थानिक पातळीवर महत्वाचा फायदा मिळाला आहे. रायगडमध्ये सध्या शिंदेंची शिवसेना 2 जागांवर आघाडीवर आहे, तर दादांची राष्ट्रवादी काँग्रेसही 2 जागांवर आघाडीवर दिसत आहे. मात्र महाविकास आघाडीचं चित्र अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही आणि अंतिम निकालावर लक्ष केंद्रित आहे. या निवडणुकीत शेकापचे अस्तित्व देखील पणाला लागले असून, त्यांच्या यशात लक्षणीय घट झाली आहे. आगामी काही वेळातच अंतिम निकाल आणि सर्व जागांवर कोणत्या पक्षाची आघाडी राहणार आहे, हे स्पष्ट होणार आहे.
Published on: Feb 09, 2026 12:36 PM
