मुख्यंत्र्यांना हिंदी बाबत एवढी आस्था का? विधानभवनातील ‘ते’ वाक्य हिंदीत उच्चारल्याबद्दल राज ठाकरे कडाडले

मुख्यंत्र्यांना हिंदी बाबत एवढी आस्था का? विधानभवनातील ‘ते’ वाक्य हिंदीत उच्चारल्याबद्दल राज ठाकरे कडाडले

| Updated on: Jul 09, 2026 | 2:23 PM

आज मनसे रेल्वे कामगार सेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादर येथील सावरकर सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री करत त्यांना चांगलेच सुनावले आहे.

राज ठाकरे म्हणाले, “रेल्वे स्टेशन असतील रेल्वे भरती असतील त्यावर लक्ष ठेवा, स्टॉल कुणाला दिले जातात त्यावर लक्ष ठेवा. बेसावध राहू नका. पायाखालची जमीन गेली तर अडचण होईल”. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंनी पुढे मुख्यमंत्र्यांच्या विधानभवनातील हिंदींतील वक्तव्याबाबत भाष्य केलं ते म्हणाले, राज्य सरकारला हिंदीबद्दल इतकी आस्था का? भाषेला कोणताच विरोध नाही, मात्र हा खेळ महाराष्ट्राबाबतच का?

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात आधी मराठीत नंतर हिंदीत एक विधान सांगितलं होतं. याबाबत राज ठाकरे म्हणाले, “मिसिंग लिंकबाबत कोणी राजकारण करेल तर…”  वाक्य संपता संपतचा त्यांनी हिंदींत “मिसिंग लिंक के बारे मे कोई राजनीती करेगा तो…” असं म्हणाले, का कोणासाठी हिंदी?” यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे.

Published on: Jul 09, 2026 2:23 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us