त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत

| Updated on: Jul 23, 2026 | 2:52 PM

दिल्लीत नीट परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात मोठे आंदोलन सुरू आहे. विद्यार्थी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या आंदोलनादरम्यान शरद पवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. उद्धव आणि राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी पवार-मोदी भेटीवर समर्पक उत्तर दिलं, त्याचीच सध्या चर्चा सुरू आहे.

आज मुंबईत उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. विद्यार्थी आंदोलन, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा, 26 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला मोर्चा यासह ठाकरे बंधू विविध विषायंवर सविस्तर बोलले. त्यांनी त्यांची भूमिका मांडली. मात्र याच वेळी त्यांना मोदी – शरद पवार यांच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरंनी अवघ्या 3 शब्दांत, पण समर्पक उत्तर दिलं, त्याचीच सगळीकडे सध्या चर्चा सुरू आहे.

पवार यांच्या भेटीविषयी प्रश्न विचारण्यात आला. राज ठाकरेंनी फक्त 3 शब्द उच्चारले. ‘त्यालाच जंतरमंतर म्हणतात’ असं म्हणतं, राज ठाकरेंनी फक्त 3 शब्दांत समर्पक प्रतिक्रिया देत विषयच संपवला. ते ऐकताच एकच खसखस पिकली.

Published on: Jul 23, 2026 1:19 PM
Follow Us