Special Report | राजकारणाच्या अभ्यासात मनसेचा अभ्यास कच्चा

| Updated on: May 24, 2022 | 10:19 PM

शरद पवार यांच्यावर टीका केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी मनसेला राजकीय अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. ते अजून राजकीय अभ्यासात कच्चे आहेत असंही त्यांनी म्हटले आहे.

Follow us on

आयोध्या दौरा रद्द करण्यासाठी शरद पवारांनीच सापळा रचल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. शरद पवारांवर आरोप करत भाजपचे खासदार बृजभूषण आणि शरद पवार यांचे फोटो ट्विट केल आहेत. आयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर बृजभूषण आणि शरद पवार यांचे जुनी मैत्री असल्यानेच त्यांनीच हे षढयंत्र रचले असल्याचाही आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मनसे या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, मावळमधील कुस्ती स्पर्धेवेळचे ते जुने फोटो आहेत. त्यामुळे त्या फोटोंचा आणि आताच्या राजकारणाचा काही एक संबंध नाही असं राष्ट्रवादीकडून स्पष्ट सांगण्यात आले. शरद पवार यांच्यावर टीका केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी मनसेला राजकीय अभ्यास करण्याचा सल्ला दिला आहे. ते अजून राजकीय अभ्यासात कच्चे आहेत असंही त्यांनी म्हटले आहे.