Ratnagiri Update | रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात पावसाच्या दमदार सरी

| Updated on: Jun 10, 2021 | 11:54 AM

मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर आता समुद्राने सुद्धा रौद्ररूप धारण केले. आज सकाळपासून समुद्र खवळलेला आहे. तिकडे दमदार पाऊस तर दुसरीकडे समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहे. 

Follow us on

Ratnagiri Update | रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात पावसाच्या दमदार सरी - TV9

एकीकडे मुसळधार पावसाचा अंदाज तर दुसरीकडे पावसाच्या पाण्याचा फटका कोकण किनारपट्टीला बसण्याची शक्यता आहे. मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर आता समुद्राने सुद्धा रौद्ररूप धारण केले. आज सकाळपासून समुद्र खवळलेला आहे. तिकडे दमदार पाऊस तर दुसरीकडे समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहे.

आज दुपारनंतर साडेतीन मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टी भागात पाहायला मिळणार आहेत. मॉन्सून सक्रिय झाल्यानंतर अमावास्येचं हे पहिले उड्डाण असणार आहे. किनारपट्टी भागात आज साडेतीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात अलर्ट जारी केलाय.