Ritesh-Genelia Deshmukh | युवा पिढी हीच लोकशाहीची ताकद; CJP आंदोलनाला रितेश-जेनेलियाचा पाठिंबा! सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
दिल्लीत सुरू असलेल्या CJP आंदोलनाला आता विविध क्षेत्रांतून पाठिंबा मिळत असून, अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनीही या आंदोलनाला सार्वजनिक पाठिंबा जाहीर केला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत देशातील तरुणांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भूमिका व्यक्त केली आहे.

रितेश आणि जेनेलिया यांनी आपल्या पोस्टमध्ये “युवा पिढी हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे” असे म्हटले आहे. विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित करत, लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, CJP आंदोलनाला देशभरातील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच कला आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून पाठिंबा मिळत आहे. रितेश आणि जेनेलिया देशमुख यांच्या भूमिकेमुळे या आंदोलनाला आणखी व्यापक चर्चेला सुरुवात झाली असून, सोशल मीडियावरही त्यांच्या पोस्टची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे.