अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र

अजित पवारांच्या अपघाताप्रकरणी रोहित पवारांचं अमित शाहांना पत्र

| Updated on: Feb 15, 2026 | 11:50 AM

रोहित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहून अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. भेटीचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर त्यांनी फेसबुकवर पोस्ट केली. तपास अपेक्षेनुसार होत नसल्याची चिंता व्यक्त करत, DGCA अधिकाऱ्यांनी भेट का नाकारली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

अजित पवारांच्या कथित विमान अपघाताप्रकरणी आमदार रोहित पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी अपघाताची व्यापक आणि स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. रोहित पवारांनी अमित शहा आणि नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु संसदेच्या अधिवेशनामुळे व्यस्ततेमुळे भेट होऊ शकली नाही असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, DGCA अधिकाऱ्यांनी भेट नाकारल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

अपघाताबाबत अनेक शंका निर्माण झाल्या असून त्या पत्रकार परिषदेद्वारे जनतेसमोर मांडल्याचे रोहित पवारांनी सांगितले. अपेक्षेनुसार तपास वेगाने होताना दिसत नसल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, यंत्रणांकडून वेळ मिळाला नसला तरी सर्व माहिती त्यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. सत्तेत नसतानाही आपण आपल्या स्तरावर पाठपुरावा करत राहणार असून, राज्य सरकार आणि सत्तेतील सर्वजणही यासाठी पाठपुरावा करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Published on: Feb 15, 2026 11:50 AM