राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू…

राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू…

| Updated on: Jul 02, 2026 | 6:38 PM

राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नुकतेच विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झालेल्या सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असून, लवकरच प्रत्यक्ष भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

माहितीनुसार, सचिन अहिर यांनी शरद पवार यांना फोन करून “मी उद्या तुम्हाला भेटायला येतो, त्यानंतर सविस्तर बोलू,” असे सांगितले. त्यावर शरद पवार यांनीही सचिन अहिर यांचे अभिनंदन करत उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

सचिन अहिर यांनी फोनवर अधिक चर्चा न करता प्रत्यक्ष भेटीत सर्व विषयांवर सविस्तर संवाद साधू, असेही शरद पवार यांना सांगितल्याची माहिती मिळत आहे.

सचिन अहिर यांनी अलीकडेच शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्यासोबत होणाऱ्या त्यांच्या भेटीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा होणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Published on: Jul 02, 2026 6:38 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us