Sandeep Deshpande | जनरल डायर नाही, कायर पाहिला! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर संदीप देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला

Sandeep Deshpande | जनरल डायर नाही, कायर पाहिला! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जवर संदीप देशपांडेंचा सरकारवर घणाघाती हल्ला

| Updated on: Jul 21, 2026 | 9:58 AM

NEET प्रश्नपत्रिका फुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांनंतर आणि CJP (कॉकरोच जनता पार्टी)च्या आंदोलनामुळे देशभरात सुरू असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना रोखताना पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठा संघर्ष झाला.

जंतरमंतरवरून संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या आंदोलनकर्त्यांना अडवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर परिस्थिती चिघळली आणि पोलिस तसेच आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्की व संघर्ष झाला. या घटनेत अनेक आंदोलनकर्ते जखमी झाल्याची माहिती समोर आली असून, त्यानंतर आंदोलन हिंसक बनले. या संघर्षात 100 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, अनेक वाहनांचेही नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, या घटनेवरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली असून, हा मुद्दा संसदेतही उपस्थित करण्यात आला आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “आम्ही जालियनवाला बागमध्ये गोळ्या झाडणारा जनरल डायर पाहिला नाही, पण विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी चालवणारा ‘कायर’ पाहिला.” त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. दिल्लीतील आंदोलनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे देशातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Published on: Jul 21, 2026 9:58 AM
Follow Us