मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्… ‘ऑपरेशन टायगर’बाबत मोठा खुलासा
ठाकरेंचा गटा फुटीच्या उंबरठ्यावर असताना मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सही न करणाऱ्या खासदारांबाबत मोठी अपडेट समोर आली. संसदीय पक्षाच्या बैठकीतून मोठी Inside Story समोर
ठाकरेंचा गटा फुटीच्या उंबरठ्यावर असताना मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सही न करणाऱ्या खासदारांबाबत मोठी अपडेट समोर आली. संसदीय पक्षाच्या बैठकीतून मोठी Inside Story समोर येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीदरम्यान लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सही न करणऱ्या खासदार संजय दिना पाटील यांना थेट फोन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बैठकीला उपस्थित राहण्याबाबत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. कारण पक्षाला त्यांच्या आणि निंबाळकरांच्या परत येण्याची अपेक्षा असावी.
सूत्रांच्या माहितीनुसार, फोनवर संजय दिना पाटील यांनी “मी विमानाने लगेच येतो” असे सांगितल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ते दिल्लीत झालेल्या बैठकीला उपस्थित राहतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात ते बैठकीला पोहोचले नसल्याने पक्षातील नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर माध्यमांनाही त्यांनी बैठकीला येतील असं सागितलं. अनेक वेळा त्यांनी वरिष्ठांना उडवा उडवीचे उत्तर दिल्याचं सांगितलं जात आहे.
यानंतर बैठकीत संजय दिना पाटील यांच्या अनुपस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बैठकीला गैरहजर का राहिले, याबाबत त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचा निर्णय झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यानुसार लवकरच संजय दिना पाटील यांना अधिकृत नोटीस पाठवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
