संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश, 17 नोव्हेंबरला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार!
खासदार संजय राऊत आणि एका ज्येष्ठ पत्रकाराविरोधातील अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. संजय राऊत यांना पुढील सुनावणीला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या वतीने प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे.
खासदार संजय राऊत आणि एका ज्येष्ठ पत्रकाराविरोधातील अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात नुकतीच सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने संजय राऊत यांना पुढील तारखेला न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊत यांचे प्रतिज्ञापत्र न्यायालयाच्या रेकॉर्डवर नसल्यामुळे न्यायालयाने याबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांच्या वकिलांची अनुपस्थिती देखील न्यायालयाच्या निदर्शनास आली.
मागील सुनावणीवेळी संजय राऊत यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र ते सादर न झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. याच प्रकरणात एका ज्येष्ठ पत्रकाराविरोधातही अवमान याचिका दाखल होती. त्या पत्रकारांच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले की, वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावरून हटवली असून, त्यांनी माफी देखील मागितली आहे. पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता होणार आहे. या सुनावणीवेळी संजय राऊत यांना स्वतः उपस्थित राहावे लागणार आहे, तर संबंधित पत्रकारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची मुभा देण्यात आली आहे.
