Sanjay Raut : ‘विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती’ संजय राऊतांचा दावा

Sanjay Raut : ‘विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती’ संजय राऊतांचा दावा

| Updated on: Nov 29, 2026 | 11:47 AM

संजय राऊत यांनी महिला आरक्षण विधेयकावर तीव्र आक्षेप घेतला आहे. हे विधेयक डिलिमिटेशनसाठी आणले असून सत्ता कायम ठेवण्याचा हा डाव असल्याची टीका त्यांनी केली. मोदी-शहांच्या राजकारणावरही त्यांनी निशाणा साधला. विधेयकाला पाठिंबा न दिल्यास खासदार फुटण्याची भीती सुप्रिया सुळे यांना वाटत असल्याचा दावाही राऊत यांनी केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या महिला आरक्षण विधेयकावर जोरदार टीका केली आहे. हे विधेयक महिला आरक्षणाच्या नावाखाली डिलिमिटेशनसाठी आणले जात असून, हा महाराष्ट्राशी आणि देशाशी प्रतारणा असल्याचा आरोप त्यांनी केला. राऊत यांच्या मते, हे विधेयक कायमस्वरूपी सत्ता टिकवून ठेवण्याच्या हेतूने आणले आहे, यात देशहित किंवा लोकशाहीचा कोणताही विचार नाही. राहुल गांधींनी शरद पवारांना बिल समर्थनानंतरही इंडिया आघाडीत स्थान अबाधित ठेवल्याबद्दल राऊत यांनी त्यांचे कौतुक केले.

राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकान या विचाराचे त्यांनी समर्थन केले, जिथे विरोधकांचाही सन्मान राखला जातो. मात्र, मोदी-शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला त्यांनी खुनशी आणि सुडवृत्तीचे म्हटले. देशात लोकशाही टिकून राहिली पाहिजे आणि संसदेची प्रतिष्ठा कायम राहिली पाहिजे, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. अशा प्रकारचे निर्घृण कायदे संसदेत मंजूर होऊ नयेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. जर विधेयकाला पाठिंबा दिला नाही, तर खासदार फुटण्याची भीती सुप्रिया सुळे यांना वाटत असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला.

Published on: Nov 29, 2026 11:47 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us