Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

| Updated on: Jul 28, 2026 | 11:13 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) आणि एनडीएत प्रवेशाच्या चर्चांवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांच्या पक्षाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी भाष्य केलं.

शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष संभ्रमावस्थेत असून एनडीएमध्ये जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चांबाबत विचारण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी, “असं का वाटतं तुम्हाला आणि हा प्रश्न का विचारला?” असा प्रतिप्रश्न केला.

यानंतर पुढे बोलताना राऊत म्हणाले की, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असून तो अजित पवार यांच्या गटापेक्षा वेगळा आहे. या पक्षाची विचारधारा स्पष्ट असून तो कधीही जातीयवादी किंवा राष्ट्रविघातक विचारसरणीच्या पक्षासोबत जाणार नाही, असा दावा त्यांनी केला.

भाजपचा अप्रत्यक्ष उल्लेख करत राऊत म्हणाले की, “शरद पवार यांची अनेक वर्षांची राजकीय विचारधारा आम्ही जवळून अनुभवली आहे. त्या विचारधारेत नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला स्थान नाही.”

संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि भाजप यांच्यातील संभाव्य राजकीय समीकरणांबाबत सुरू असलेल्या चर्चांना नवं वळण मिळालं असून, राज्याच्या राजकीय वर्तुळात या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

Published on: Jul 28, 2026 11:12 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us