‘ऑल पार्टी मिटींगला जे उपस्थित रहात नाहीत ते…’, संजय राऊत यांची मोदींवर टीका
पंतप्रधान टीम इंडियाच्या गोष्टी करतात पण ऑल पार्टी मिटींगला ते उपस्थित रहात नाहीत अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी टीम इंडियाने संकटकाळात एकत्र यावे असे म्हटले आहे. मात्र, पंतप्रधान विरोधी पक्षाला कधी विचारात घेतात का ? जे ऑल पार्टी मिटींगला उपस्थित नाहीत ते टीम इंडियाच्या गोष्टी करतात अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. जर पंतप्रधान टीम इंडियावर विश्वास ठेवत असतील तर ही गोष्टी चांगली आहे, हा राष्ट्रीय विचार आहे आणि विरोधी पक्षानी अशा संकटकाळात सरकारला पाठींबा दिला आहे. जर आपल्या देशात लॉकडाऊन लावणार नाहीत तर ही चांगलीच गोष्ट असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, पंतप्रधान यांच्या पक्षात टीम इंडिया आहे का ? त्यांच्या पक्षात ‘हम दो हमारे दो’ असेच वातावरण आहे. महाराष्ट्रात जर टीम महाराष्ट्र व्हावा असे वाटत असेल तर विधानसभा,आणि विधानपरिषदेत विरोधी पक्ष नेते का नाहीत तर मग टीम महाराष्ट्र होणार कसा असाही सवाल राऊत यांनी केला आहे. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात एकट्या चाकणकर दोषी नाहीत, देशातील अनेक नेते तेथे जात होते. दीपक केसरकर यांनी आरोप केला आहे की ४० आमदार तेथे जात होते. मग त्यांची चौकशी होणार का ? असा सवाल राऊत यांनी केला आहे. भोंदूबाबाला एकप्रकारे सरकारने राज्यमान्यता दिली होती. त्याला राज्यमान्यता देणारे लोक राज्य सरकारमध्ये आहेत अशीही टीका त्यांनी यावेळी केली.
