Sanjay Raut Press | दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर खोचक निशाणा

Sanjay Raut Press | दगडावरून आधार शोधणाऱ्यांना नोबेल मिळालाच पाहिजे; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांवर खोचक निशाणा

| Updated on: Jul 31, 2026 | 10:49 AM

नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP)च्या आंदोलनानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. भाजप नेते तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनादरम्यान वापरण्यात आलेल्या दगडांवरील बोटांचे ठसे आधार कार्डशी लिंक करून तपास केला जाईल, असे वक्तव्य केले होते. या विधानावरून आता मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत त्यांना विज्ञान क्षेत्रातील नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्याचा टोला लगावला. “चंद्रकांत पाटील यांनी दगडावरील बोटांचे ठसे आधार कार्डशी लिंक करण्याचा जो शोध लावला आहे, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे नाव नोबेल पुरस्कारासाठी पाठवावे. एवढेच नव्हे, तर त्यांना एखाद्या जागतिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरूही करावे,” असा उपरोधिक सल्ला त्यांनी दिला.

राऊत पुढे म्हणाले की, “आधार कार्ड संकल्पनेचे जनक नंदन निलेकणी यांनीही हा शोध ऐकला असता तर ते दोन दिवस कोमात गेले असते. इतका मोठा वैज्ञानिक शोध आजपर्यंत कुणीही लावला नव्हता. दगडावरील ठसे आधार कार्डशी जोडण्याची कल्पना ही अभूतपूर्व आहे,” असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला.

यावेळी संजय राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला. “चंद्रकांत पाटील यांचे दगडांशी जुने नाते आहे. ते यापूर्वीही दगडांबाबत अनेक विधाने करत आले आहेत. त्यांच्या पक्षात दगड-धोंड्यांसारखे बिनडोक लोक भरले असल्याचा हा परिणाम दिसत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून सुरू झालेल्या या वादामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू झाली आहे.

Published on: Jul 31, 2026 10:49 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us