Sanjay Raut : तो गोड मुलगा आहे, त्याची विधाने देखील फार गोड आहेत; राऊतांकडून अमित ठाकरेंचं तोंडभरून कौतुक
Sanjay Raut Reaction On Amit Thackeray Statement : अमित ठाकरेंनी काल दिलेल्या प्रतिक्रिये नंतर आज त्यावर संजय राऊत यांनी भाष्य करत अमित ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
मी कॅफेत नाही तर घरी जाईन, असं शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. अमित ठाकरे यांनी काल केलेल्या कॅफेवरील विधानानंतर आज संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यासाठी ते कॅफे नाही तर दुसरं घर आहे. पुस्तक पाठवलं तसं प्रस्ताव पाठवा, कॅफेमध्ये या असं विधान काल अमित ठाकरेंनी युतीच्या विषयावर केलं होतं. याच मुद्द्यावर आज प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत संजय राऊत यांनी अमित ठाकरेंचं कौतुक देखील केलं आहे.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर काल पत्रकारांनी अमित ठाकरेंना प्रश्न विचारल्यावर त्यांनी पुस्तक पाठवलं तसं मित्र असतील तर घरी या. माध्यमांमध्ये सकारात्मक असल्याचं सांगण्यापेक्षा प्रस्ताव पाठवा, कॅफेटेरिया मध्ये येऊन कॉफी प्या, असं अमित ठाकरेंनी म्हंटलं होतं. त्यावर आज राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत म्हणाले की, अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिलेले आहे. गोड मुलगा आहे तो. जसा आमचा आदित्य आहे तसा अमित आहे. त्याची विधाने देखील फार गोड आहेत. त्याच्या मनामध्ये ज्या भावना आहेत, त्या भावनेचे मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो. त्यांची विधाने आजकाल फार चांगली आहेत. आदित्य देखील भूमिका फार उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन म्हणजे अजून काय मनोमिलन हवे आहे? मी कॅफेमध्ये नाही तर मी घरी जाईल. आमच्यासाठी ते कॅफे नाही तर दुसरे घरच आहे, असंही यावेळी राऊत यांनी सांगितलं.

VIDEO: आशाताईंचा आग्रह, CM गायले पण शेलारांचं गाणं ऐकून पोट धरून हसाल

अहमदाबाद दुर्घटनेनंतर DGCA ची मोठी अॅक्शन, एअर इंडियाला मोठा धक्का

एसटीच्या या बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry, कारण...

ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर भारतात शक्य नाही, अपघाताच कारण कसं समजणार?
