Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी…; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या घटनांचा उल्लेख करत भाजपवर गंभीर आरोप केले.
राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या मुद्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या घटनांचा उल्लेख करत भाजपवर गंभीर आरोप केले.
संजय राऊत म्हणाले की, “जो पक्ष रामाच्या नावाने राजकारण करतो, त्याच पक्षाशी संबंधित लोकांवर राम मंदिरातील दानपेट्यांचा अपहार केल्याचे आरोप होत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारे आणि मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारणारे लोक स्वतःला रामभक्त म्हणवून घेत आहेत.”
राऊत यांनी आपल्या टीकेत ऐतिहासिक संदर्भ देत म्हटले की, “इतिहासात गझनवीने सोमनाथ मंदिरावर अनेक वेळा हल्ले केल्याचा उल्लेख आहे. मात्र अयोध्येतील राम मंदिरातील दानपेट्या गेल्या काही महिन्यांत तब्बल 66 वेळा फोडल्या गेल्याचा दावा केला जात आहे. या घटनांचीही इतिहासात नोंद व्हायला हवी.”
यावेळी त्यांनी कायद्याच्या अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कायदा हा सत्ताधारी पक्षासाठी नसून केवळ विरोधकांवर कारवाई करण्यासाठीच वापरला जात आहे. सत्ताधारी पक्षातील लोकांवर गंभीर आरोप झाले तरी त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र भाजपला विरोध करणाऱ्यांवर कायद्याचा वापर करून दबाव आणला जातो,” असा आरोप त्यांनी केला.
राम मंदिरातील दानपेटी चोरीच्या घटनांवरून संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांच्या आरोपांवर आता भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
