Sanjay Raut : हा नियतीने घेतलेला सूड आहे; राऊतांची फडणवीसांवर घणाघाती टीका
Sanjay Raut Criticized CM Fadnavis : छगन भुजबळ यांना महायुतीने मंत्रिमंडळात सामील करून घेतलं आहे. त्यावर आता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
भुजबळांना तुरुंगात पाठवणारे हे फडणवीसच होते. भुजबळांना राज्यातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी ठरलं, ईडीच्या माध्यमातून तुरुंगात पाठवलं आणि आज नियतीने घेतलेला सूड असा आहे की, देवेंद्र फडणवीसांना त्याच भुजबळांना आपल्या मंत्रिमंडळात सामील करून घ्यावं लागलं आहे. इतकंच नाही तर त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करावा लागला आहे, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील कमबॅकवर त्यांनी ही टीका केली आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेतल्याचा आम्हाला आनंदच आहे. ते 25 वर्ष शिवसेनेत होते. त्यांना मंत्रिपद या निर्णयाचं स्वागतच आहे. पण भुजबळांना मंत्रिपद दिल्यामुळे स्वत: देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खोटे मुखवटे गळून पडले आहेत. कारण भुजबळांना तुरुंगात पाठवणारे हे फडणवीसच होते. पण आज त्यानंच भुजबळ किती महान आहेत हे सांगावं लागतं आहे. म्हणजे एक तर तुम्ही खोटं बोललात की भुजबळ भ्रष्टाचारी आहेत किंवा ते जामिनावर सुटलेले आहेत आणि भ्रष्टाचारी असण्याचं तुम्हाला वावडं नाही, असं म्हणत राऊतांनी महायुती सरकारला चांगलंच फैलावर धरलं.

शिंदे सेनेकडून ठाण्यात ठाकरेंना डिवचणारे बॅनर, नेमकं काय म्हटलंय?

अजित पवार यांच्याकडून गावोगावी बूथ पाहणी

पहलगामच्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 'त्या' दोघांना NIA कडून बेड्या

माळेगाव साखर कारखाना निवडणूक; अजित पवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न
