पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा… संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?

पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा… संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?

| Updated on: Jun 11, 2026 | 11:00 AM

राजकारणातील वादविवाद, दावे आणि प्रतिदावे काही नवे नाहीत. मात्र, आता त्यात संजय राऊतांच्या एका विधानामुळे भर पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी सुचक मुद्द्यावर सटीक भाष्य केले.

राजकारणातील वादविवाद, दावे आणि प्रतिदावे काही नवे नाहीत. मात्र, आता त्यात संजय राऊतांच्या एका विधानामुळे भर पडली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी सुचक मुद्द्यावर सटीक भाष्य केले. यावेळी त्यांनी पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावाचाही उल्लेख केला.

संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणताही मोठा विक्रम केलेला नाही. नेहरूच सर्वात जास्त काळ राहिलेले यशस्वी पंतप्रधान आहेत. ते जवळपास 16 वर्षे पंतप्रधान होते. त्यांचे कार्य हे कोणाशी तुलना करण्यासारखे नाही. मोदींनी तर बारा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाही, तर निवडून ते फक्त 2014 आणि 2019मध्ये आले. त्यानंतर फक्त घोडेबाजारी झाली.

पुढे राऊत म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देश अगदी गरीब आणि कंगाल होता. नेहरूंनी या काळात विकासाचे काम केले. यानंतर राऊत पक्षफोडीबाबतही बोलले, त्यांनी थेट पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, यांच्या रक्तातच कारस्थान आहे. मोदींवर शरद पवार साहेबांचे उपकार आहेत. शिवसेनेचेही उपकार आहेत. पण ते कारस्थानी आहेत कारण विकासावर भर न देता त्यांनी फक्त पक्षांची फोडाफोडी केली.

Published on: Jun 11, 2026 11:00 AM
Follow Us