Santosh Bangar : संतोष बांगर यांची आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल, सोशल मीडियावर होतायत ट्रोल; अडचणी वाढणार

| Updated on: Jul 17, 2022 | 10:35 PM

संतोष बांगर यांच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहेत. एका कार्यकर्त्याला तर ते शिवीगाळ करत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip viral) झाली आहे.

Follow us on

हिंगोली : कळमनुरी विधान सभेचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांनी जे गद्दार म्हणतील त्यांच्या कानाखाली वाजवा, असे काल वक्तव्य केले होते. त्यानंतर आमदार संतोष बांगर हे सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. त्यांच्या अनेक कॉल रेकॉर्डिंग आता सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहेत. एका कार्यकर्त्याला तर ते शिवीगाळ करत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल (Audio clip viral) झाली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांविषयी एकीकडे चीड असताना त्या आगीत हे बंडखोर आमदार स्वत:च तेल ओतत असल्याने अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. तर बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात येण्याअगोदर साहेबांना 100 कोटींची ऑफर आहे, असे व्यक्तव्य केले होते. त्या वक्तव्याची नेटकरी टिंगल करत आमदार बांगर यांना त्यातील 50 लाख द्या, अशी मागणी करत असल्याची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे.