Sharad Pawar : राज ठाकरेंबाबत शरद पवार यांचं सर्वात मोठं विधान, त्या गोष्टीवरच ठेवलं बोट, युतीवर म्हणाले..

Sharad Pawar : राज ठाकरेंबाबत शरद पवार यांचं सर्वात मोठं विधान, त्या गोष्टीवरच ठेवलं बोट, युतीवर म्हणाले..

| Updated on: Jun 07, 2025 | 1:32 PM

'माझी इच्छा आहे की, महाविकास आघाडी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका एकत्रित लढाव्यात.', पत्रकारांशी अनौपचारिक चर्चांवेळी शरद पवारांनी हे मोठं विधान केलं.

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा रंगताना दिसताय. तर राज्याच्या राजकारणात ठाकरे ब्रँड कायम रहावा, अशी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल असे म्हणत युतीसंदर्भात संकेत नाही तर थेट बातमी देऊ, असा सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर खरंच ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. अशातच उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेच्या युतीसंदर्भात शरद पवार यांनी एक मोठं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. पत्रकारांशी संवाद साधत असताना अनौपचारिक चर्चांवेळी शरद पवारांनी राज ठाकरेंच्या त्या गोष्टीवरच बोट ठेवल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंना गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये करण्यात यश येतं, असं शरद पवार म्हणाले.

Published on: Jun 07, 2025 01:31 PM