पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश

पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश

| Updated on: Aug 17, 2026 | 11:36 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण विरोधातच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या एका बैठकीत त्यांनी हे मोठे विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पवारांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही संभ्रमात न राहण्याचे आवाहन केले. सूत्रांनुसार, शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले की, […]

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) सामील होण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण विरोधातच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षाच्या एका बैठकीत त्यांनी हे मोठे विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पवारांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही संभ्रमात न राहण्याचे आवाहन केले.

सूत्रांनुसार, शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितले की, “आपण विरोधात आहोत. कुणीही संभ्रमात राहू नका. आपल्याला पुढे सुद्धा जोमानं काम करायचं आहे. पक्षाच्या आणि संघटनेच्या वाढीसाठी जोमानं काम करा.” या बैठकीत तरुणांना जास्तीत जास्त सहभागी करून घेण्यावर भर दिला गेला, तसेच जेन झी आंदोलनानंतर तरुणांकडून वाढलेल्या अपेक्षांवरही चर्चा झाली. पक्षात तरुण आणि अभ्यासू प्रवक्त्यांना संधी दिली जाईल, असेही पवार म्हणाले.

काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, तसेच सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, पवारांच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे या चर्चांना सध्या तरी पूर्णविराम लागला आहे.

Published on: Aug 17, 2026 11:36 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us