Sunetra Pawar On Sharad Pawar : तीन वेळा वेळ मागितली, भेटीची वेळही मिळाली; तरीही सुनेत्रा पवार…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अद्याप शरद पवारांची रुग्णालयात भेट घेतलेली नाही. सूत्रांनुसार, त्यांच्या कार्यालयाने भेटीची वेळ तीन वेळा मागितली होती. २ तारखेपासून शरद पवारांवर उपचार सुरू आहेत आणि अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली आहे, मात्र सुनेत्रा पवारांच्या भेटीची प्रतीक्षा कायम आहे. या घडामोडी लक्षवेधी ठरत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गेल्या २ तारखेपासून पुण्यामध्ये आणि नंतर मुंबईमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे किंवा फोनवरून चौकशी केली आहे.
मात्र, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अद्याप शरद पवारांची रुग्णालयात भेट घेतलेली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून शरद पवारांच्या भेटीसाठी तीन वेळा वेळ मागितली गेली होती आणि त्यांना वेळ देण्यातही आली होती. असे असतानाही सुनेत्रा पवार अद्याप पवारांच्या भेटीसाठी आलेल्या नाहीत.
यापूर्वी छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेल यांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी रुग्णालयात जाऊन पवारांची भेट घेतली आहे. तसेच, पार्थ पवार आणि जय पवार यांनीही फोनवरून शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
