Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात

Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात

| Updated on: Nov 28, 2026 | 4:32 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डीहायड्रेशनच्या त्रासामुळे पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील अहिल्यादेवी होळकर कॅन्सर रुग्णालयात त्यांच्या काही चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांना ब्रीच कँडीत हलवण्यात आले. डॉक्टरांनुसार, त्यांची प्रकृती स्थिर असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डीहायड्रेशनच्या त्रासामुळे पुन्हा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची ताजी माहिती समोर आली असून, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे. ही माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनीच दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या काही महत्त्वपूर्ण चाचण्या अहिल्यादेवी होळकर कॅन्सर रुग्णालयात करण्यात आल्या होत्या. आज दुसऱ्यांदा ते अहिल्यादेवी होळकर कॅन्सर रुग्णालयात तपासणी आणि चाचण्यांसाठी गेले होते.

या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा ब्रीच कँडी रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या गेल्या तीन दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडीमध्ये उपचार सुरू आहेत. शरद पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना डीहायड्रेशन झाले होते, परंतु आता ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर अधिक उपचार सुरू असून, वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Published on: Nov 28, 2026 4:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us