विलीनीकरण नाही, पण NDA सोबत जाणार?; शरद पवारांच्या पुढच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष! मोदी-शहा भेटींमागचं गूढ काय?

विलीनीकरण नाही, पण NDA सोबत जाणार?; शरद पवारांच्या पुढच्या निर्णयाकडे देशाचं लक्ष! मोदी-शहा भेटींमागचं गूढ काय?

| Updated on: Jul 30, 2026 | 3:19 PM

राज्यातील राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांच्या भेटीगाठींना वेग आला असून, या घडामोडींमुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA)मध्ये सहभागी होणार का, याबाबतच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या सलग बैठकींमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.

२२ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर २३ जुलै रोजी पार्थ पवार आणि प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या बैठकीनंतर दोन्ही गटांतील संवाद वाढत असल्याची चर्चा सुरू झाली.

यानंतर २७ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. तटकरे यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनीही अमित शाह यांची भेट घेतली. मात्र, ही भेट मुलगी रेवतीच्या विवाह स्वागत समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर मंगळवारी सुनील तटकरे यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दरम्यान, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याने या राजकीय हालचालींना आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे.

या सर्व भेटींच्या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस कोणतेही औपचारिक विलीनीकरण न करता NDA सरकारमध्ये सहभागी होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सत्तेत सहभागी होण्याचा पर्याय चर्चेत असला तरी पक्षविलीनीकरणाचा कोणताही संबंध नसल्याचे शरद पवार यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील राजकीय संवाद आणि सलग होत असलेल्या बैठका लक्षवेधी ठरत आहेत. केंद्रातील मोदी सरकारचा कार्यकाळ अजून सुमारे तीन वर्षे शिल्लक असताना, शरद पवार गटाचे आठ खासदार NDAला पाठिंबा देतील का, याकडे राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 30, 2026 3:19 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us