Sharad Pawar : शरद पवारांचा आज दिल्ली दौरा, राजकीय घडामोडींना वेग, दिल्ली वारीत चित्र बदलणार का?

Sharad Pawar : शरद पवारांचा आज दिल्ली दौरा, राजकीय घडामोडींना वेग, दिल्ली वारीत चित्र बदलणार का?

| Edited By: | Updated on: Jun 26, 2022 | 11:57 AM

आज दुपारी शरद पवार हे दिल्लीकडे रवाना होत आहेत. राज्याची राजकारणाची सुत्रे आता दिल्लीतून हलणार की आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या दृष्टीकोनातून त्यांचा हा दौरा आहे हे पहावे लागणार आहे. मात्र, शिवसेना आमदारांचे बंड हे शरद पवार करणार का थंड हीच चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

मुंबई : राज्यात राजकीय घडामोडींना वेग येत असतानाच आज दुपारी शरद पवार हे दिल्लीकडे रवाना होत आहेत.  (Shivsena) शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमुळे राजकीय उलथा-पालथ झाली आहे. सरकार टिकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडी ही न्यायालयीन लढा लढणार आहे. ज्याप्रमाणे (MVA) महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात (Sharad Pawarशरद पवार हे केंद्रस्थानी होते त्याच प्रमाणे आता सरकार अडचणीत असताना त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे राज्याची राजकारणाची सुत्रे आता दिल्लीतून हलणार की आगामी राष्ट्रपती निवडणुकीच्या दृष्टीकोनातून त्यांचा हा दौरा आहे हे पहावे लागणार आहे. मात्र, शिवसेना आमदारांचे बंड हे शरद पवार करणार का थंड हीच चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

 

 

Published on: Jun 26, 2022 11:57 AM