Ashok Kharat Case | शिर्डी जमीन गैरव्यवहार प्रकरणात कोर्टात जोरदार युक्तिवाद; भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी

| Updated on: May 05, 2026 | 5:08 PM

शिर्डी येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी भोंदू बाबा खरात यांच्यावतीने न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आला. सुनावणीदरम्यान खरात यांच्या वकिलांनी फिर्यादी जमीन मालकाने गुन्हा दाखल करण्यास विलंब का केला, असा सवाल उपस्थित केला. तसेच या व्यवहारात एकूण 5 कोटी 52 लाख रुपये देण्यात आले असून, सर्व रक्कम फिर्यादीच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचा दावा बचाव पक्षाने केला.

दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई करत आरोपीला राहाता सत्र न्यायालयात हजर केले. तपासासाठी आरोपीची सखोल चौकशी आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी न्यायालयाकडे सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे शिर्डी परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जमीन व्यवहारातील अनियमिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: May 05, 2026 05:06 PM
Follow Us