रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार

रोहित पवार आणि सुनेत्रा पवारांना ईडी गुन्ह्यात दिलासा मिळणार

| Updated on: Feb 28, 2026 | 1:16 PM

25 हजार कोटींच्या कथित शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला आहे. यामुळे मूळ गुन्हा रद्दबातल झाल्याने ईडीच्या मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यातूनही त्यांना आणि इतर 70 आरोपींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हे प्रकरण राज्यामध्ये प्रचंड गाजले होते.

25 हजार कोटींच्या कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट मुंबई सत्र न्यायालयाने स्वीकारला आहे. त्यामुळे, मूळ गुन्हा रद्द झाल्याने, ईडीने दाखल केलेला मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा देखील आता रद्दबातल होणार आहे. या निर्णयामुळे सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि या प्रकरणातील इतर 70 आरोपींना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिसांनी मूळ गुन्ह्यात पुरावे नसल्याचे सांगत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. सत्र न्यायालयाने तो स्वीकारल्याने, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मूळ गुन्हा रद्द झाल्यानंतर ईडीच्या गुन्ह्यालाही अर्थ उरत नाही. यामुळे हे प्रकरण राज्यामध्ये चर्चेत असून, पवार कुटुंबीयांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दिलासा मिळेल.

Published on: Feb 28, 2026 01:16 PM
Follow Us