शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती…

शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती…

| Updated on: Aug 12, 2026 | 3:54 PM

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कुणाचे, यावर सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करत आहेत. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.

1999 मध्ये शिवसेनेच्या घटनेत पक्षप्रमुखपदाचा उल्लेख नव्हता, असा मुद्दा निवडणूक आयोगाकडून मांडण्यात आल्याचे सिब्बल यांनी सांगितले. यावर त्यांनी, “1999 च्या घटनेमध्ये पक्षप्रमुखपद नव्हत, हे यांना 2026 ला कळालं का?” असा सवाल उपस्थित केला.

तसेच पक्षातील घडामोडींची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आल्याचा दावा सिब्बल यांनी केला. यासाठी पुरावा म्हणून कागदपत्रे आणि पोचपावती असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. “आमच्याकडे आयगाची पोचपावती देखील आहे. हा पुरावा आहे की आम्ही सर्व घडामोडींची आयोगाला माहिती दिली,” असे कपिल सिब्बल यांनी म्हटले.

शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह याबाबत सुरू असलेल्या या सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पुढील युक्तिवादात कोणते मुद्दे आणि दावे समोर येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Published on: Aug 12, 2026 3:06 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us