Sanjay Raut Uncut | राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut Uncut | राज्यसभेच्या सीटवरून प्रियंका चतुर्वेदी नाराज?, संजय राऊत काय म्हणाले?

| Updated on: Mar 26, 2026 | 11:49 AM

काल शिवसेना उबाठा पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असताना ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. या बैठकीत राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यांनी याबाबत बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यावरही नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

काल शिवसेना उबाठा पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांची बैठक झाली. ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असताना ही बैठक महत्त्वाची मानली जात होती. या बैठकीत राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी नाराज झाल्याची चर्चा आहे. त्यांनी याबाबत बैठकीत नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यावरही नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना उत्तर दिल्याचंही समजतं. त्यामुळे या बैठकीचे पुढे काही परिणाम होतील का, याबाबत चर्चा सुरू आहे.
मात्र, आज पत्रकार परिषदेत शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं, असं काही घडलं नाही. या सर्व चर्चां अफवा आहेत असं राऊत म्हणाले, तसेच “आम्ही विचार करून निर्णय घेतो, म्हणूनच पक्ष वाढला आहे. अशा प्रकारचं काही घडलं नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, “मी पक्षाच्या सुरुवातीपासूनच आणि माझ्या जन्मापासून या पक्षामध्ये आहे,” असं सांगत राऊत यांनी या प्रकरणावर अधिक बोलणं टाळलं.

Published on: Mar 26, 2026 11:49 AM
Follow Us