‘मविआ’ला मोठा धक्का! बड्या नेत्याने सोडली साथ, शिंदेगटातील इनकमिंग सुरूच…
राज्यातील राजकारणात सध्या कोणत्याच मोठ्या निवडणूका नसतानाही पक्षप्रवेशांचे वारे जोरात वाहताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर संघटन विस्तार सुरू असल्याचं चित्र आहे.
राज्यातील राजकारणात सध्या कोणत्याच मोठ्या निवडणूका नसतानाही पक्षप्रवेशांचे वारे जोरात वाहताना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष मजबूत करण्यासाठी राज्यभरात मोठ्या प्रमाणावर संघटन विस्तार सुरू असल्याचं चित्र आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांत विविध पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हानिहाय विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील प्रभावी नेते, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यामुळे ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गटाला मोठा राजकीय फटका बसत असल्याचे बोलले जात आहे.
अशात सोलापूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जिल्हा संघटक रमेश हसापुरे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे पक्षप्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत.
