Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात

Shivsena Hearing Case : शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणातील सुनावणीला सुरुवात

| Updated on: Nov 18, 2026 | 3:10 PM

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता युक्तिवाद करत आहेत. त्यांनी कर्नाटकातील २०१९ च्या सत्तास्थापनेचा दाखला दिला, तसेच बाळासाहेब पाटील प्रकरणातील निकालाचा विरोधकांकडून चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे म्हटले. सरन्यायाधीशांनी मेहतांना आज युक्तिवाद पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता हे युक्तिवाद करत आहेत. आमदार अपात्रता प्रकरणातील युक्तिवाद त्यांनी पुढे चालू ठेवला आहे.

मेहता यांनी आपल्या युक्तिवादात कर्नाटकातील २०१९ च्या राज्य सरकार स्थापनेचा दाखला दिला. कर्नाटकात कोणत्याही पक्षाला बहुमत नसताना जनता दलाला पाठिंबा दिला गेला, मात्र ते सरकार फार काळ टिकले नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. तसेच, विरोधकांचा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयाच्या बाळासाहेब पाटील प्रकरणातील निकालावर आधारित असल्याचे नमूद करत, या निकालाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे मेहता यांनी म्हटले. सुभाष देसाई प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या सूचनांचाही उल्लेख त्यांच्याकडून करण्यात आला.

सरन्यायाधीशांनी ॲडव्होकेट ध्रुव मेहता यांना आजच युक्तिवाद पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मेहता यांनी देखील आज युक्तिवाद पूर्ण करण्याचा मानस असल्याचे सांगितले आहे. या सुनावणीकडे महाराष्ट्राचे राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे.

 

 

Published on: Nov 18, 2026 3:10 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us