मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर थेट…

मोठी बातमी! फुटीर खासदारांमध्ये चलबिचल सुरु; ठाकरे गटाच्या नोटीसनंतर थेट…

| Updated on: Aug 10, 2026 | 3:07 PM

शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या 6 खासदारांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. लोकसभा अध्यक्षांनी त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला दिलेल्या मान्यतेविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीबाबत आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

या प्रकरणातील सर्व 6 फुटीर खासदारांनी सुनावणीसाठी वेळ मागितला आहे. दुसरीकडे, लोकसभा अध्यक्षांनी अद्याप या प्रकरणात स्वतःची बाजू मांडलेली नाही. त्यामुळे न्यायालयातील सुनावणी लांबणीवर गेली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना नेमकी कुणाची, याबाबत न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच खासदारांच्या विलीनीकरणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला आहे. ठाकरे गटाने या विलीनीकरणावर आक्षेप घेतला आहे. केवळ लोकसभेतील खासदारांच्या संख्येच्या आधारे विलीनीकरण करता येणार नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मूळ राजकीय पक्षाची मान्यता, पक्षाची घटना आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया यांचा विचार होणे आवश्यक असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.

Published on: Aug 10, 2026 3:07 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us