Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?

Shiv Sena Symbol Row : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचा फैसला लांबणीवर; पुढील सुनावणी कधी?

| Updated on: Nov 04, 2026 | 8:59 PM

राजू वाघमारे यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केला. विधानसभा कालावधी संपल्याने अध्यक्षांचा निर्णय योग्य असून, अपात्रतेचा निर्णय आता अकॅडमीक ठरेल, असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालय अशा निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाही. पुढील सुनावणी दिवाळीनंतर होणार आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात राजू वाघमारे यांनी सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडली. आमचे ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता यांनी असा युक्तिवाद केला की, विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निर्णय योग्य होता, कारण सभागृहाचा कालावधी आता संपलेला आहे. घटनेच्या १०व्या परिशिष्टानुसार, अध्यक्षांना अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार सभागृह अस्तित्वात असतानाच असतो. एकदा सभागृहाचा कालावधी संपला की, अध्यक्ष त्याबाबत कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत.

सर्वोच्च न्यायालय देखील या स्थितीत हस्तक्षेप करू शकत नाही, कारण स्पीकर आणि सभागृह अस्तित्वात नसताना कोणाला निर्देश द्यायचे हा प्रश्न निर्माण होतो. राणाच्या आणि संजीव कोकचांच्या पूर्वीच्या न्यायनिर्णयांचा दाखला देत, वाघमारे यांनी स्पष्ट केले की, सभागृहाचा कालावधी संपल्यावर अपात्रतेचा निर्णय केवळ अकॅडमीक ठरतो आणि असे निर्णय घेण्यात न्यायालयांना स्वारस्य नसते. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर आमदार अपात्र ठरले असते, या मीडियातील कल्पनेला त्यांनी फेक नरेटिव्ह संबोधले. दिवाळीनंतर पुढील सुनावणीत अपात्रतेचे निकष कसे चुकीचे आहेत, हे मांडले जाईल, असे राजू वाघमारे यांनी सांगितले.

 

Published on: Nov 04, 2026 8:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us