Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या स्वतंत्र भूमिकेच्या चर्चांनंतर यवतमाळमध्ये राजकीय वातावरण तापले असून, खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या स्वतंत्र भूमिकेच्या चर्चांनंतर यवतमाळमध्ये राजकीय वातावरण तापले असून, खासदार संजय देशमुख यांच्या विरोधात शिवसैनिकांनी तीव्र आंदोलन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यवतमाळमध्ये शिवसैनिकांनी खासदार संजय देशमुख यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध नोंदवला. यावेळी आंदोलकांनी पुतळ्याला जोडे मारत संताप व्यक्त केला.
शिवसेना खासदारांच्या कथित फुटीच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. “आवाज कोणाचा? शिवसेनेचा!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
दरम्यान, या आंदोलनामुळे स्थानिक राजकीय वातावरण अधिकच तापले असून, शिवसैनिकांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले.
राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया विविध ठिकाणी उमटत असून, पुढील काही दिवसांत या प्रकरणाला कोणते वळण मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.