Ashok Kharat Case | अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर

Ashok Kharat Case | अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर

| Updated on: Mar 27, 2026 | 11:25 AM

भोंदू खरात हा ग्राहकांची माहिती गोळा करण्यासाठी स्वतंत्र दोन टीमचा वापर करत होता . तो रेफरन्सद्वारे, नातेवाईकांकडून माहिती संकलन करत होता, अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळे ऑफीसमध्ये आलेल्या लोकांना भेटीच्या पहिल्या 5 मिनिटांत अचूक माहिती सांगायचा आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा. यासाठी तो कोल्ड रीडिंग व हॉट रीडिंग तंत्रांचा वापर करायचा.

अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्याच्यावर महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणुकीचे गंभीर आरोप आहेत. लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत त्याने अनेकांना जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे. कार्यालयातील सीसीटीव्हीत काही प्रकार कैद झाल्याची माहिती आहे. या प्रकरणाची एसआयटीकडून चौकशी सुरू असून तपासात त्याचे फसवणुकीचे प्रकार उघड होत आहेत. अजून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोंदू खरात हा ग्राहकांची माहिती गोळा करण्यासाठी स्वतंत्र दोन टीमचा वापर करत होता . तो रेफरन्सद्वारे, नातेवाईकांकडून माहिती संकलन करत होता, अशी माहिती उघड झाली आहे. त्यामुळे ऑफीसमध्ये आलेल्या लोकांना भेटीच्या पहिल्या 5 मिनिटांत अचूक माहिती सांगायचा आणि त्यांचा विश्वास संपादन करायचा. यासाठी तो कोल्ड रीडिंग व हॉट रीडिंग तंत्रांचा वापर करायचा.

हॉट रीडिंग म्हणजे त्यामध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते. तर कोल्ड रिडिंगमध्ये पहिले काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावत समोरच्याला भ्रमित केलं जातं. मानसशास्त्र व फेस रीडिंगचा प्रभावी उपयोग करत खरातने अनेकांना गंडा घातला, त्यांची फसवमूक करत लुबाडलं. लोकांना भीती घालण्याचं तंत्रही त्याने वापरलं होतं.

Published on: Mar 27, 2026 11:25 AM
Follow Us