Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम

Shrirampur : श्रीरामपुरातील अशोक बँकेवर RBIचे निर्बध, मात्र परवाना कायम

| Updated on: Aug 30, 2026 | 11:52 PM

श्रीरामपूर येथील अशोक बँकेवर रिझर्व्ह बँकेने काही निर्बंध लादले असले तरी बँकेचा परवाना कायम ठेवण्यात आला आहे. येत्या सहा महिन्यांत हे निर्बंध समाप्त होतील, अशी माहिती बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दिली आहे. ठेवीदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. बँकेबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही मुरकुटे यांनी केले. […]

श्रीरामपूर येथील अशोक बँकेवर रिझर्व्ह बँकेने काही निर्बंध लादले असले तरी बँकेचा परवाना कायम ठेवण्यात आला आहे. येत्या सहा महिन्यांत हे निर्बंध समाप्त होतील, अशी माहिती बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी दिली आहे. ठेवीदारांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. बँकेबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही मुरकुटे यांनी केले.

बँक विकली जाणार किंवा तिचे विलीनीकरण होणार अशा गैरसमजांना त्यांनी स्पष्टपणे फेटाळून लावले. मुरकुटे यांनी ठेवीदारांना आश्वस्त केले की, त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. पाच लाखांपर्यंतच्या ठेवी असलेल्या खातेदारांना (बचत, चालू आणि मुदत ठेवी) नव्वद दिवसांच्या आत त्यांचे पैसे परत मिळतील. आरबीआयच्या नियमांनुसार बँकेला ठेवीदारांचे पैसे द्यावे लागणार आहेत.

Published on: Aug 30, 2026 11:52 PM
Follow Us