मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार

मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार

| Updated on: Aug 08, 2026 | 5:16 PM

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवरून राजकीय वातावरण तापले असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी तब्बल 18 कोटी रुपयांची कथित देणगी चोरी होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांचीही चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी चोरीचा मुद्दा समोर आला. राज ठाकरे यांनी मंदिरातील दानपेटी आणि देणगी संकलनाबाबत गंभीर आरोप करत दरवर्षी 18 कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा दावा केला. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कथित प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धिविनायक मंदिरात गेल्या पाच वर्षांत जमा झालेल्या देणग्या आणि दानाच्या संकलनाची तपासणी केली जाणार आहे. यासोबतच मंदिर ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदींचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

गेल्या पाच वर्षांतील देणगी संकलन, त्याची नोंद, आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करून या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतला जाणार आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आहे.

त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेल्या 18 कोटी रुपयांच्या कथित देणगी चोरीच्या आरोपांमध्ये नेमके किती तथ्य आहे, मंदिर ट्रस्टच्या आर्थिक नोंदींमध्ये काही अनियमितता आढळते का आणि गेल्या पाच वर्षांतील देणगी संकलनाचा नेमका हिशोब काय आहे, याचा तपास आता चौकशीतून समोर येणार आहे. या चौकशीच्या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 08, 2026 5:12 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us