सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

| Updated on: Aug 17, 2026 | 11:18 AM

किल्ले सिंहगडावरील हाणामारीचे आणखी काही व्हिडीओ आता समोर आलेले आहेत. 15 ऑगस्ट रोजी किल्ले सिंहगडावरती दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. हाणामारीमध्ये काही महिला सुद्धा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भर पावसात झालेल्या हाणामारीचे व्हिडीओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायत. हाणामारीचं कारण अस्पष्ट असून हवेली पोलिसांकडून घटनेची दखल घेण्यात आलेली आहे आणि पुढील […]

किल्ले सिंहगडावरील हाणामारीचे आणखी काही व्हिडीओ आता समोर आलेले आहेत. 15 ऑगस्ट रोजी किल्ले सिंहगडावरती दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. हाणामारीमध्ये काही महिला सुद्धा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. भर पावसात झालेल्या हाणामारीचे व्हिडीओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतायत. हाणामारीचं कारण अस्पष्ट असून हवेली पोलिसांकडून घटनेची दखल घेण्यात आलेली आहे आणि पुढील कार्यवाही या व्हिडीओच्या आधारे केली जातीय. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतायत. आणखी नवीन व्हिडीओ आलेले आहेत. नेमकं कारण काय होतं? पोलीस तपास कुठपर्यंत पोहोचलाय? 15 ऑगस्टच्या निमित्तानं सुट्टीनिमित्तानं अनेक पर्यटक जे आहेत ते किल्ले सिंहगडावरती गेलेले होते. मात्र एका महिलेला जे आहे, ती छत्री लागली अशा पद्धतीचं प्राथमिक कारण सध्या आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच कारणावरून जे आहे, ते दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं आपण सध्या पाहतोय.

व्हिडीओमध्ये आपण पाहतोय की एकमेकांची कपडे, त्याचबरोबर दगडफेक जी आहे, ती सुद्धा करण्यात आली. त्यामुळं सिंहगडावरच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला पाहायला मिळतोय. सध्या हवेली पोलीस ठाण्यामध्ये अद्यापपर्यंत या संदर्भात तक्रार जी आहे, ती अजूनपर्यंत दाखल झालेली नाही. मात्र पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे की या व्हिडीओच्या माध्यमातून आम्ही या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो करतो आहोत. 15 ऑगस्टला सिंहगड किल्ल्यावरती आपण पाहतोय की थेट दगडफेक जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे अनेक पर्यटक जे आहेत ते याच्यामध्ये जखमी होऊ शकले असं मात्र आपण पाहतोय की हा वाद जो आहे तो काही वेळामध्येच निवळला. मात्र व्हिडीओमध्ये आपण पाहतोय की एकमेकांना मारहाण जी आहे ती दोन गटांकडून करण्यात येते आणि किल्ले सिंहगडावरचं 15 ऑगस्टचं आपल्याला पाहतोय की हा व्हिडीओ पाहायला मिळतोय. निश्चितच या घटनेमुळे आता किल्ले सिंहगडावरील खरं तर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय असं बोलायला हरकत नाहीये. प्रदीप या घटनेसंदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आपल्याकडून घेत राहणार आहोत. तुरतास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.

Published on: Aug 17, 2026 11:17 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us