सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी

सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी

| Updated on: Mar 08, 2026 | 2:46 PM

सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाने काळी रंगपंचमी साजरी करत सत्ताधारी भाजपचा निषेध केला आहे. मराठा समाजाला महापौर पदापासून डावलल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे आणि शहराध्यक्ष रोहिणी टडोलकर यांनी राजकीय अन्याय केल्याचा आंदोलकांचा दावा आहे. मराठा समाजाला न्याय देण्याची त्यांची प्रमुख मागणी आहे.

सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काळी रंगपंचमी साजरी करत सत्ताधारी भाजपचा निषेध करण्यात आला. सोलापूर महापालिकेत मराठा समाजाला महापौर पदापासून डावलल्यामुळे हे तीव्र आंदोलन सुरू आहे. अनेक दिवसांपासून मराठा क्रांती मोर्चा या मागणीसाठी संघर्ष करत आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे आणि शहराध्यक्ष रोहिणी टडोलकर यांनी सोलापूर महापौर निवडीवरून मराठा समाजावर राजकीय अन्याय केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आमदार देवेंद्र कोटे यांचे नातेवाईक विनायक कोंडेल यांना महापौर करण्यात आल्याने मराठा समाजात तीव्र नाराजी आहे. समाजाला राजकीय न्याय न मिळाल्यास आगामी निवडणुकीत मतपेटीतून उत्तर देण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

Published on: Mar 08, 2026 02:46 PM
Follow Us