वांगचुक यांना मोठा धक्का! त्या याचिकेवर कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आता उपचार…
दिल्ली उच्च न्यायालयाने पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली आंग्मो यांनी दाखल केलेली याचिका अमान्य केली आहे. त्यामुळे सोनम वांगचुक यांना त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात हलवण्याची मागणी न्यायालयाने स्वीकारलेली नाही. या निर्णयाकडे देशभराचे लक्ष लागले होते.

याचिकेत दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जंतरमंतर येथून सफदरजंग रुग्णालयात त्यांच्या इच्छेविरुद्ध दाखल केल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्याची आणि उपचारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली होती.
मात्र, सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका अमान्य केली. त्यामुळे सध्या त्यांच्यावर सुरू असलेल्या वैद्यकीय उपचारांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणाची सुनावणी दुपारी 2.30 वाजता सुरू झाली होती. न्यायालयाच्या निर्णयाकडे अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांचे लक्ष लागले होते. न्यायालयाचा निर्णय समोर आल्यानंतर या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.