आरक्षण म्हणजे नेमकं काय; केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांनी सांगितली संपूर्ण परिस्थिती

आरक्षण म्हणजे नेमकं काय; केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांनी सांगितली संपूर्ण परिस्थिती

| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 8:27 PM

आपल्याकडच्या राजकारण्यांची दृष्टीच वेगळी आहे. मागास असणे ही पूर्णपणे राजकीय बाब झाली आहे, असं रोखठोक मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात वनराईच्या कार्यक्रमात व्यक्त केलंय.

नागपूर : “देशात ज्याला त्याला नोकरी हवी असते. चौकटीबाहेरचा विचार कुणी करत नाही आणि समजून घेत नाही. पण, मुळात सरकारी नोकर्‍याच नाही तर त्यात आरक्षण कुठून देणार? आरक्षण हा केवळ राजकारणाचा विषय झालाय. आपल्याकडच्या राजकारण्यांची दृष्टीच वेगळी आहे. मागास असणे ही पूर्णपणे राजकीय बाब झाली आहे,’ असं रोखठोक मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात वनराईच्या कार्यक्रमात व्यक्त केलंय.