राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत… दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
मंत्री दत्ता भरणे यांनी सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष मजबूत असल्याचे म्हटले आहे. मराठवाड्यासह राज्यातील दुष्काळी परिस्थिती, ऊस गाळप हंगाम सुरू करण्याच्या निर्णयावर त्यांनी भाष्य केले. तसेच, रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देत, पक्षांतर्गत चौकशी आणि आकृतीबंधासारख्या मुद्द्यांवरही आपले मत मांडले.
मंत्री दत्ता भरणे यांनी नुकत्याच झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत असून, अजित पवारांचे विचार गावागावांपर्यंत पोहोचवून पक्षबांधणीवर भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. विशेषतःराष्ट्रवादी काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना, भरणे यांनी स्पष्ट केले की, अशा कोणत्याही महत्त्वपूर्ण निर्णयावर सुनेत्रा पवार यांचा निर्णय अंतिम राहील आणि तो आम्हा सर्वांना मान्य असेल. “सुनेत्रा वहिनी पवार ह्या आमच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, त्या आमच्या सर्वांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या देशाच्या अध्यक्ष आहेत आणि सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष, आमची संघटना ही भक्कम आहे,” असे दत्ता भरणे यांनी म्हटले.
Published on: Sep 09, 2026 7:53 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
