Sunetra Pawar | सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी

Sunetra Pawar | सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी

| Updated on: Jan 31, 2026 | 3:52 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तत्काळ निर्णय प्रक्रियेची सुरुवात केली असून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली आहे. यासाठी दिलीप कोळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला आणि नंतर सर्व आमदारांच्या संमतीने सुनेत्रा पवार यांना पक्षाचा गटनेतेपद देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय पक्षाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

अजित पवार यांच्या निधन झालं आहे. यानंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आले आहे. अजित पवारांचा अकाली मृत्यू हा सर्वांसाठी मोठा धक्का आहे. त्यांच्या जाण्यामुळे मंत्रीमंडळातील जागा कोण घेणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेतृत्व पदं कोणास मिळणार, आणि अजित दादांचा राजकीय वारसा कोण पुढे चालवणार याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते.

आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तत्काळ निर्णय प्रक्रियेची सुरुवात केली असून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली आहे. यासाठी दिलीप कोळसे पाटील यांनी प्रस्ताव मांडला आणि नंतर सर्व आमदारांच्या संमतीने सुनेत्रा पवार यांना पक्षाचा गटनेतेपद देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय पक्षाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

सुनेत्रा पवार यांना गटनेतेपद देऊन, पक्षाचे पुढील राजकीय धोरण त्यांच्याच नेतृत्वाखाली ठरेल असे स्पष्ट झाले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व प्रमुख निर्णय प्रक्रिया आणि राजकीय दिशा सुनेत्रा पवार यांच्या भोवती केंद्रीत होणार आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वातावरणातही मोठी हालचाल दिसून येत आहे.

तसेच, सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी आज होणार आहे. या शपथविधीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नेतृत्व संरचना स्पष्ट होईल. यामुळे अजित पवारांचा राजकीय वारसा सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली पुढे नेला जाणार आहे.

Published on: Jan 31, 2026 03:50 PM