सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
दरम्यान आता सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी जाणून घ्या, दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात काय काय बदल झाले? या नोटीसमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे.
राजकीय वर्तुळातून काल एक धक्कादाय माहिती समोर येताच मोठी खळबळ उडाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पक्षातील राष्ट्रीय अध्यक्ष पदावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या नोटीसमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या चर्चांना उधाण येताच राष्ट्रवादीत आंतर्गत वाद सुरू आहे का? राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनीच नोटीस पाठवली की यामागे दुसरं कोणचां डोकं? अशा चर्चांनाही जोर आला.
दरम्यान आता सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट आल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी जाणून घ्या, दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात काय काय बदल झाले? या नोटीसमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीवर आक्षेप घेण्यात आला आहे. 26 फेब्रुवारी 2026 रोजी झालेली निवड ही घटान विरोद्ध सांगितली जात आहे. कारण, २८ जानेवारीला अजित पवारांचं निधन झालं, त्यानंतर पक्षाने प्रफुल्ल पटेल हे अंतरिम अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील असं निवडणूक आयोगाला सांगितलं. 18 फेब्रुवारीला बृजमोहन श्रीवास्तव यांनी योग्य प्रक्रिया पार न पाडताच निवडणूक सुरु केली. कोणत्याही बैठकी किंवा सुचने शिवायच सुनेत्रा पवार यांना एकतर्फी निवडून दिलं. किमान एक नोटीस जारी करायला हवी होती असंही यात सांगण्यात आलं आहे. या दरम्यान दोनदा पाठवल्या गेल्येल्या पत्रांमध्ये मोठी विसंगती असल्यचं समोर आलं. अन् त्यामुळे नोटीस पाठवण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे पक्षात निष्पक्ष निवडणूका न घेतल्यास पुढील कादेशीर कारवाई केली जाईल असंही या पत्रात नमुद केल्याचं सांगितलं जात आहे.
