VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 2 June 2022

| Updated on: Jun 02, 2022 | 2:56 PM

विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांना 9 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. 10 जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 13 जूनची मुदत असेल. 20 जून रोजी मतदान पार पडेल. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. 20 जून रोजी सायंकाळी 5 नंतर मतमोजणी होईल. त्यावेळी विधान परिषदेचं चित्रं स्पष्ट होणार आहे.

Follow us on

विधानपरिषद निवडणुकीसाठी सर्व उमेदवारांना 9 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. 10 जूनला निवडणूक अर्जांची छाननी केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी 13 जूनची मुदत असेल. 20 जून रोजी मतदान पार पडेल. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडेल. 20 जून रोजी सायंकाळी 5 नंतर मतमोजणी होईल. त्यावेळी विधान परिषदेचं चित्रं स्पष्ट होणार आहे. सुभाष देसाई, रामराजे निंबाळकर, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, संजय दौंड, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, रामनिवास सिंग आणि दिवाकर रावते या दहा सदस्यांचा 22 जुलै रोजी कार्यकाळ संपत आहे. तत्पूर्वी या दहा जागांसाठी 20 जूनला मतदान होत आहे. त्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये चूरस वाढली आहे.