VIDEO : 50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 6 September 2021
ते माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची भाषा करत आहेत. पण मी कुणाचा कोथळा काढायची भाषा केली हे सांगायला पाहिजे ना?, असं सांगतानाच चंद्रकांत पाटलांना बाबासाहेब पुरंदेरंचं शिवचरित्रं पाठवून देऊ. त्यांनी ते वाचावं. इतिहासात कोथळा काढणं म्हणजे काय? हे समजून घ्यावं, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
ते माझ्यावर गुन्हा दाखल करण्याची भाषा करत आहेत. पण मी कुणाचा कोथळा काढायची भाषा केली हे सांगायला पाहिजे ना?, असं सांगतानाच चंद्रकांत पाटलांना बाबासाहेब पुरंदेरंचं शिवचरित्रं पाठवून देऊ. त्यांनी ते वाचावं. इतिहासात कोथळा काढणं म्हणजे काय? हे समजून घ्यावं, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. कुणाचा कोथळा बाहेर काढणार मी ते सांगायला पाहिजे ना. ते पाठित खंजीर खुपसणार होते. चंद्रकांत पाटील पाठीत खंजीर खुपसण्याची भाषा करत होते. आता चंद्रकांत पाटील कुणावर खटला दाखल करणार याची माहिती घ्यावी लागेल, असा टोला राऊत यांनी लगावला.
Published on: Sep 06, 2021 02:57 PM
