आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
NEET पेपर लीक प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा मुद्दा आज सुप्रीम कोर्टात उपस्थित करण्यात आला. मात्र, CJI सूर्यकांत यांनी या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला.

सुनावणीदरम्यान वकील नरेंद्र मिश्रा यांनी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याचा आरोप केला. त्यांनी न्यायालयाला या घटनेचे व्हिडिओही असल्याचे सांगितले. त्यावर CJI सूर्यकांत यांनी, “आमचा आणि तुमचाही वेळ वाया घालवू नका. आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत,” अशी मौखिक टिप्पणी केली.
सोमवारी CJP च्या आंदोलनाच्या आवाहनानंतर हजारो विद्यार्थी आणि कार्यकर्ते दिल्लीत रस्त्यावर उतरले होते. संसदेकडे मोर्चा नेण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि पोलिसांनी लाठीचार्ज केला.
CJP ने पोलिस कारवाईत शेकडो आंदोलनकर्ते जखमी झाल्याचा दावा केला आहे. विरोधकांनीही या घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, दिल्ली हायकोर्टानेही या प्रकरणी दाखल याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत पुढील सुनावणीसाठी प्रकरण सूचीबद्ध केले आहे.