AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?; सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर ज्योती वाघमारेंचा पलटवार

1 एकर शेतीमधून 100 कोटींचं वांग्याचं उत्पन्न कसं निघतं?; सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर ज्योती वाघमारेंचा पलटवार

| Updated on: Jun 06, 2026 | 4:05 PM
Share

विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याच्या आरोपांवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. निवडणुकीत उमेदवारांना आर्थिक अमिषे दाखवून आणि दबाव टाकून माघार घेण्यास भाग पाडल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असताना, सत्ताधारी पक्षाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “अशा प्रकारचे घोडेबाजार थांबवायचे असतील तर ही निवडणूक पद्धत बंद करावी किंवा ओपन व्होटिंगची व्यवस्था लागू करावी. यासाठी मी संसदेत विधेयक आणणार आहे. गरज पडल्यास निवडणूक आयोगाकडे आणि न्यायालयातही जाणार आहे.” लोकशाही प्रक्रियेत पैशांचा हस्तक्षेप थांबला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याला शिवसेना (शिंदे गट)च्या खासदार ज्योती वाघमारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता येत नाही, ते इतरांना सल्ले देत आहेत. जर संसदेत विधेयकच मांडायचे असेल, तर एका एकर शेतीतून १०० कोटी रुपयांचे वांग्याचे उत्पन्न कसे मिळते, याचीही चौकशी व्हायला हवी,” असा टोला त्यांनी लगावला.

पुढे बोलताना वाघमारे म्हणाल्या, “सुप्रिया ताईंनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 100 कोटी रुपयांचे उत्पन्न कसे मिळवायचे, याचे मार्गदर्शन करावे. तसे झाले तर शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही कमी होईल.” त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण अधिकच तीव्र झाले आहे.

Published on: Jun 06, 2026 04:05 PM

Follow Us
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक